तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई- तिसऱ्या लाटेची 100 टक्के शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे, मात्र याला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, लहान मुलांना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकार पूर्ण सज्ज असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सोमवार पासून होणाऱ्या अनलॉकवर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे. बऱ्याच दिवसाने होणाऱ्या अनलॉकमुळे संभाव्य गर्दी लक्षात घेता नागरिकांनी कोरोनाविषयक नियम गांभीर्याने पाळावेत असं यावेळी त्यांनी आवाहन केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*