एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान -परिवहन मंत्री अनिल परब

एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान झाले आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. शाळा, कॉलेज सुरू झाले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे, असं परब म्हणाले. मी स्वतः अनेक कर्मचाऱ्यांना भेटत आहे. त्यांना आवाहन करतोय. समिती या बाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे संप सुरू ठवण्याला अर्थ नाही. आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक आणि राज्याचे मोठे नुकसान होत आहे, असं ते म्हणाले. अनेक कर्मचारी आता रुजू झाले आहेत.मात्र जे कर्मचारी रुजू झालेले नाहीत त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो. एसटी खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, असं ते म्हणाले.
परब म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जसे आमचे दायित्व आहे तसे राज्याच्या बाबतीत देखील आमचे दायित्व आहे. आंदोलनामुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे. इतक्या वेळी आवाहन करून देखील जर ऐकणार नसतील कारवाई शिवाय पर्याय नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांची कारवाई मागे घेण्याचा प्रश्न येतच नाही. व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आम्हाला कर्मचारी भरती करावी लागेल, असंही ते म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*