ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी कोव्हीडमुक्त वातावरणात सुरू करा – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मंडणगड ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी कोव्हीड रुग्णालय इमारतीतच सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत पाठ फिरवल्याच चित्र आहे.रुग्णाची तपासणी कोव्हीडमुक्त वातावरणात व्हावी अशी मागणी मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांच्याकडे दिलेल्या निवेदनातील महितीण्यासार, मंडणगड तालुक्यातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेवून ग्रामीण रुग्णालय येथे कोव्हीड रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यानंतर याठिकाणीची नियमित आजारांवरील ओपीडी बंद करून प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून उपचार घ्यावेत असे सांगण्यात आले. मात्र यामुळे नागरिकांची गैरसोय आणि उपचार मिळण्यास विलंब होवू लागला. खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या तालुका आढावा बैठकीत यावर चर्चा होवून खासदारांनी सदरची ओपीडी अन्य उपलब्ध जागेत चालू करण्यासंदर्भात आदेशीत केले होते. तरीही ओपीडी कोव्हीड रुग्णालयाच्या इमारतीतच सुरू करण्यात आली आहे. तसेच याच ठिकाणी कोव्हीड टेस्ट करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रुग्णालयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र ओपीडी संख्या पाहिल्यानंतर स्पष्ट होते. नागरिकांना कोव्हीड मुक्त वातावरण उपचार मिळावेत अशी मागणी राष्ट्रवादीने केली असून तसे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, माजी जि.प.सदस्य प्रकाश शिगवण, माजी सभापती भाई पोस्टुरे, युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, शहर अध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक सुभाष सापटे, युवा नेते राकेश साळुंखे आदी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*