एसटीच्या विलिनकरणाच्या मागणीवर ठाम असल्यानं राज्यात गेल्या शंभर दिवसाहून अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे.यामुळं ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडचणींचा सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, राज्य शासनानं यासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशानं त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल शासनानं हायकोर्टात सादर केला आहे. यावर मंगळवारी कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाच्या या निर्णयाकडं सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. पण आता एसटीच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितल्यानं ही सुनावणी शुक्रवारी निश्चित करण्यात आली आहे.