‘एसटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे’; उपमुख्यमंत्री अजित पवार

जळोची -एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जेवढी मदत करता येईल. तेवढी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना केले. बारामती येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

पवार म्हणाले की, इतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यां बरोबरीने आपल्याही कर्मचाऱ्यांना आणले आहे. पूर्वी त्यांचे वेतन जरूर कमी होते. सध्या याबाबतचा निर्णय न्यायालयात आहे. सध्या शाळा महाविद्यालय सुरू झाले आहेत. गरिबांना परवडणारा प्रवास म्हणून एसटीकडे पाहिले जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*