रत्नागिरी : रत्नागिरी तहसील कार्यालय व रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी 25/08/2023 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 या वेळेत आस्था सोशल फाउंडेशन कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडियम, मच्छी मार्केट समोर, मारुती मंदिर येथे दिव्यांग बंधू भगिनींसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 01/01/2024 या अर्हता दिनांक वर आधारित मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 व 1 जानेवारी 2024 रोजी ज्या दिव्यांगांचे वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत, त्या नवीन मतदार दिव्यांगांची मतदार नोंदणी करून घेता येईल.
रत्नागिरी शहरातील तसेच तालुक्यातील (बौद्धिक अक्षम वगळून ) 18 वर्षावरील सर्व दिव्यांगांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, आपण सदर शिबिरामध्ये मध्ये सहभागी होऊन मतदान नोंदणी, मतदान कार्डला आधार कार्ड जोडणी, त्याचप्रमाणे मतदार यादीत दिव्यांग म्हणून “फ्लॅग” करण्याकरिता आवश्यक ते फॉर्म भरावेत.

या शिबिरात येताना सोबत

१) जन्म दाखला प्रत, २) आधार कार्ड प्रत, ३) दिव्यांग सर्टिफिकेट (UDID ) प्रत, ४) पासपोर्ट साईज एक फोटो इत्यादी कागदपत्रे सोबत आणावे.

ज्यांच्या कडे मतदान कार्ड आहे परंतु अन्य काही बदल आहे, त्यांनी मतदान कार्ड सोबत आणावे. यावेळी आपल्याला दिव्यांग मतदार ओळखपत्र व मतदानाच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सुविधांविषयी माहिती दिली जाणार आहे.

तरी या शिबिराला स्वतः दिव्यांग, दिव्यांग मुलांचे पालक यांनी उपस्थित राहून शिबिराचाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सुलभ निवडणूक सनियंत्रण समिती सदस्य संकेत चाळके व आस्थाच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी केले आहे.