ऑक्सिजनसाठी ‘सोना अलॉयज्’ला २४ तासात मंजूर केला अतिरिक्त वीज जोडभार उद्यापासून मिळणार १० ते १५ टन प्राणवायू

मुंबई– महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार अटीतटीचे प्रयत्न करीत असताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सक्रिय पुढाकारामुळे राज्याला लवकरच दररोज किमान १५ टन प्राणवायू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील ‘सोना अलॉयज्’ या पोलाद निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या कारखान्यात रोज १० ते १५ टन ऑक्सिजन निर्मितीसाठी विजेचा जोडभार वाढवून मागितल्यानंतर अवघ्या २४ तासात तो मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याची विक्रमी कामगिरी डॉ.राऊत यांच्या सक्रिय देखरेखीखाली पूर्ण झाली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*