चिंचघर येथील स्नेहल शिंदेने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

खेड – तालुक्यातील चिंचघर वेताळवाडी येथील सुकन्या स्नेहल दिलीप शिंदे हीने आशियाई स्पर्धेत चीन येथे सहभागी होऊन कबड्डीचे सुवर्णपदक भारताला पटकावून दिले आहे.

स्नेहल शिंदे ही मुळची कोकणातील खेड तालुक्यातील चिंचघर येथील आहे. तिला लहानपणापासून कबड्डी खेळ आवडतं असे. कबड्डी खेळात ती स्टार खेळाडू म्हणून तिने भारतीय संघात ओळख मिळवली आहे.

चीन देशांत आशियाई स्पर्धेत भारतीय संघातून स्नेहल हीने सहभाग घेतला होता. संपूर्ण स्पर्धेत तिने चमकदार कामगिरी बजावत भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

स्नेहल सध्या पालकांच्या समवेत पुणे येथे वास्तव्यास असून तिचे पुणे विमानतळावर स्वागत झाले तेव्हा पालकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले होते.

इतक्या कष्टानंतर सुवर्णपदक देशाला मिळवून दिलं आहे. संपूर्ण घराण्यासह देशात नाव कमावलेस, अशी प्रतिक्रिया दिलीप शिंदे यांनी दिली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*