पालघर- केळवे समुद्रात बुडून नाशिक येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थाचा आणि त्याला वाचविण्यास गेलेल्या एका स्थानिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आली आहे. आणि या मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या अन्य मुलांचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार समुद्राच्या पाण्यात पाच जण बुडाल्याचा सांगितले जात असून यातील दोघा जणांचा मृत्यू झाला असून, इतरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नाशिक येथील ब्रम्हा व्हॅली स्कूलचा एक मोठा गट पालघरमधील केळवे येथे फिरण्यासाठी आला होता. त्यातील हे विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील एक विद्यार्थी पाण्यात पोहण्यास म्हणून गेला असता तो बुडू लागला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी म्हणून बाजूलाच असलेल्या आदिवासी पाड्यातील एक मुलगा समुद्रात गेला. मात्र, या दोघांचाही मृत्यू झाला. आणखी दोन जण बुडाल्याचे वृत्त असून घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.