रत्नागिरीत सुरु होणार तीन मोठे शैक्षणिक प्रकल्प, करारावर झाल्या सह्या

रत्नागिरी : जिल्ह्यात सुरू करण्यता येणा-या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे उपकेंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांची आंतरराष्ट्रीय लायब्ररी, रामटेक येथील कवी कालीदास यांचे रत्नागिरीत उपकेंद्र सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. हे तिन्ही मोठे शैक्षणिक प्रकल्प रत्नागिरीत सुरू करण्याच्या करारावर स्वाक्षरी झाल्या, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. झुम अॅपद्वारे ही पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्याच्यादृष्टीने महत्त्वाचा विषयांवर आज बैठका झाल्या. यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय लायब्ररी उभारली जाणार आहे. शिवचरित्रावर अभ्यास केलेल्या पाच तज्ञांची समिती त्यासाठी नेमली जाणार आहे. जगात छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणतेही पुस्त हवे असेल तर ते या रत्नागिरीतील लॅबररित मिळेल. तर रामटेक येथील कवी कालीदास यांचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू केले जाणार आहे. या तिन्ही शैक्षणिक प्रकल्पांच्या करारावर आज स्वाक्षरी झाल्या. त्यामुळे हे प्रकल्प होणार यावर शिक्का मोर्तब झाला आहे. ऑगस्ट महिन्यात याचे भुमिपूजन केले जाईल. त्यासाठी अपेक्षित निधी मंजूर आहे. बीएड काॅलेजमध्येच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिट उपकेंद्र सुरू केले जाणार आहे. कवी कालीदास यांचे उपकेंद्र महिला विद्यालयाच्या जागेत सुरू होईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*