ग्रामीण भागातल्या लसीकरणावर लक्षणीय भर, ग्रामीण भागापर्यंत व्याप्ती पूर्णपणे शक्य : डॉ. व्ही. के. पॉल

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसारच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 21 जून सोमवारी देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रांपैकी 63.68% मात्रा ग्रामीण भागात देण्यात आल्या आहेत. त्या दिवशी देण्यात आलेल्या मात्रांपैकी 56.09 लाख मात्रा ग्रामीण लसीकरण केंद्रातून देण्यात आल्या तर शहरी भागात 31.9 लाख लोकांनी लस घेतली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांनी कोविड -19 संदर्भातल्या पत्रकार परिषदेत ही महिती दिली.लसीकरणासाठी ग्रामीण भागावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण भागात लसीकरण व्याप्ती तीव्र असून उत्तम प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवार 21 जून पासून, देशातल्या ग्रामीण – शहरी लोकसंख्या विभागणीच्या प्रमाणात लसीकरणाचे आकडे असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत लसीकरण अभियान नेणे शक्य असल्याचे यावरून सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*