कोविन पोर्टलमध्ये महत्त्वपूर्ण बदल, नोंदणी सुलभ होणार

नवी दिल्ली-देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. सरकारने 1 मेपासून  18 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू केले आहे. या अनुषंगाने लोकांना कोरोना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.  त्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी केली जात आहे. पण लसीचा अभाव आणि पोर्टलवरील नोंदणीशी संबंधित समस्यांमुळे, लोकांचा गोंधळ  उडत आहे. याचदरम्यान यंत्रणा सुधारण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज झाले असून, कोविन पोर्टलमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे.

या बदलांद्वारे काही तक्रारी दूर करण्यात आल्या आहेत. तसेच अशा काही सुविधा जोडल्या गेल्या आहेत. यामुळे नोंदणी सुलभ होणार आहे. कोविन पोर्टलवर झालेल्या बदलांमधील सर्वात मोठा बदल म्हणजे डिजिटल कोड वैशिष्ट्य. आता नोंदणीच्या वेळी वापरकर्त्याच्या मोबाइलवर 4 अंकी डिजिटल सुरक्षा कोड येईल, जो सुरक्षितपणे ठेवावा लागेल. लसीकरणानंतर हा कोड लसीकरणास द्यावा लागतो. त्यानंतरच संबंधित व्यक्तीची लस स्थिती सुधारली जाईल. इतकेच सांगायचे तर तुम्हाला लसी दिल्यानंतरच हे गृहित धरले जाणार आहे. 
 
पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने लोकांनी नाव नोंदणी केली होती. तेव्हापासून यासंदर्भात लोकांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्या. लोकांनी सोशल मीडियावर उघडपणे या समस्यांचा उल्लेख केला. हे लक्षात घेऊन सरकारने आता कोविन पोर्टलमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.लसीकरण  न करता देखील लसीकरण पूर्ण झाल्याचा मेसेज मिळत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या. ज्यानंतर हे नवे फिचर जोडले गेले आहे. हे बदल 8 मे पासून म्हणजे आजपासून लागू होतील. यानंतर कोडशिवाय लसीकरण होणार नाही. कोविन प्रणालीवर अंमलात आणलेले हे नवीन फिचर लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंगसाठी आहे. लसीकरण केंद्रात 4 अंकी डिजीटल कोड दाखवल्यानंतर लस दिली जाईल. या व्यतिरिक्त, जर आपल्याला लसीकरणानंतर डिजिटल प्रमाणपत्र तयार करायचे असेल तर आपल्याला पोर्टलवर आपला कोड टाकावा लागेल. यानंतर, आपल्याला लस यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल. पण जर मेसेज आला नाही तर आरोग्य केंद्राला त्याबद्दल सांगावे लागेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*