दापोली – लायन्स क्लबच्या वतीने दापोली एसटी स्टँड सर्कल या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आला.

मुंबई, पुणे व मंडणगड कडून येणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना शहरातून जाणाऱ्या रस्त्याची माहिती होण्याकरिता लायन्स क्लबने फलक लावलेला आहे.

यावेळी डिजी एम. के. पाटील, ला. अध्यक्ष अतुल मेहता, ला. सेक्रेटरी कौशिक मेहता, ला. मनोहर जैन, ला. माजलेकर, ला. प्रभाकर शिंदे, ला. प्रसाद मेहता अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.