खेड : रत्नागिरी येथील भागोजी कीर विधी महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धेत खेडमधील शिवतेज संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम मेमोरियलचे पारितोषिक पटकावले.
सिद्धयोग विधी महाविद्यालयात उत्तम वकील घडविले जातात. या ठिकाणी प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्था विविध उपक्रम राबवते. यामध्ये मोफत इंग्रजी भाषा कौशल्य वर्ग, लेखनकौशल्य वर्ग, वक्तृत्व आणि वादविवाद कौशल्य वर्ग, लीगल ड्राफ्टिंग प्रशिक्षण, कॉर्पोरेट प्लेसमेंट आणि वकिलांसाठी असलेल्या विविध करिअरबाबत प्रशिक्षण शिबिर तसेच संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसनासाठी शिवचरित्र स्वाध्यायमाला अशा विशेष उपक्रमांचा सहभाग आहे. संस्था प्रभावी निकालांसाठी साप्ताहिक उजळणी वर्गही राबवते, असे महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांनी सांगितले.
![](https://mykokan.in/index.html/wp-content/uploads/2023/03/IMG-20230327-WA0035-1024x683.jpg)
आकार देण्यात शिक्षकांची मेहनत
शिवतेज संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयात आम्हाला शिक्षण आणि करिअरच्यादृष्टीने मिळणाऱ्या सुविधा उत्तम आहेत. भविष्याला खऱ्या अर्थाने आकार देण्यासाठी तेथील शिक्षकवृंद मेहनत घेताना दिसून येतो. त्यामुळेच हे यश आम्ही प्राप्त करू शकलो, अशी प्रतिक्रिया तेथील विद्यार्थिनी अनुजा राऊत हिने दिली.
![](https://mykokan.in/index.html/wp-content/uploads/2023/03/IMG-20230327-WA0033-1024x683.jpg)