श्री चक्रधरस्वामी जयंती मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे उत्साहात साजरी

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे श्री चक्रधरस्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

श्री चक्रधरस्वामी हे कृष्ण धर्माच्या महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर समाजसुधारक तसेच मराठीतील पहिला चरित्रग्रंथ ‘लीळाचरित्र’ चे नायक होते.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी श्री चक्रधरस्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर त्यांनी स्वामीजींच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत उपस्थितांना माहिती दिली.

त्यांनी मराठी भाषेतून तत्त्वज्ञान शिकवून मराठीला धर्मभाषेचे स्थान प्राप्त करून दिले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*