इंडियन प्रीमअर लीगच्‍या (आयपीएल) महालिलाव सुरु झाला असून आज आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेल्‍या खेळाडू हा श्रेयस अय्‍यर ठरला आहे. श्रेयसला कोलकाता नाईट रायडर्स संघाने तब्‍बल १२.२५ कोटी रुपयला खरेदी केले आहे. यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सला नवा कर्णधार मिळाला आहे.

डेव्‍हिड वार्नर आणि पॅट कमिन्‍सचे नुकसान

यांच्‍या लिलावात ऑस्‍ट्रेलियाच्‍या डेव्‍हिड वार्नर आणि पॅट कमिन्‍स याचे मोठे नुकसान झालेल्‍या चे दिसत आहे. मागील सीझनमध्‍ये वार्नर याला हैदराबादने १२ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. यावेळी दिल्‍लीच्‍या संघाने त्‍याला ६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. पॅट कमिन्‍स याला मागील सीजनमध्‍ये कोलकाताने १५.५० कोटी रुपयांना खरेदी केले हाते. यंदा कोलकाताने पॅट कमिन्‍सला ७.२५ कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.