शिवसेना नेते अनंत गीतेंनी घेतले खेडमधील देवीचे दर्शन

खेड : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी खेड येथील नवरात्र उत्सवात हजेरी लावून श्री देवी मातेचे दर्शन घेतले आहे.

त्यांच्यासमवेत जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार संजय कदम, माजी उप सभापती विजय जाधव, माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, अरविंद तोडकरी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरप्रमुख दर्शन महाराज यांनी अनंत गीते यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी शिवसेना (उबाठा) गटाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*