लांजा : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांचे संघटना बांधणीचे काम जोरदार सुरू आहे. लांजा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटातील आगवे येथील जोशीगाव ग्रामस्थांनी शिवसेना पक्षावर व राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांच्या प्रमूख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

त्याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, तालुका संघटक प्रसाद माने, ऋषिकेश पत्याने, प्रमिला पत्याने, सुनील पत्याने, मनोहर भिडे, शंकर गोरे, विभागप्रमुख अनिल गुरव, गावकार चंद्रकांत जोशी, शंकर जोशी, इलियास बंदरी, प्रकाश मोडक, लक्ष्मण मांडवकर, अनंत जोशी, प्रकाश आलीम, दीपक मोडक, सुरेश जोशी, विजय जोशी, गोविंद जोशी, गजानन जोशी, दामिनी पत्याने व सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.