दापोली – मंडणगड तालुका पेंशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवाजी कदम यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी : दापोली – मंडणगड तालुका पेंशनर अससोसिएशनची नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची पदाधिकारी निवडीची पहिली सभा नुकतीच दापोली येथील पेंशनर सभागृहात पार पडली. या सभेमध्ये दापोली मंडणगड तालुका पेंशनर अससोसिएशनच्या अध्यक्षपदी निवृत्त मंडळ अधिकारी शिवाजी कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्याच प्रमाणे उपाध्यक्षपदी मनोहर पवार, मंडणगड तालुक्याच्या उपाध्यक्षपदी विजय भागवत, सचिवपदी प्रेमानंद महाकाळ, सहसचिवपदी शरद जाधव व खजिनदार पदी विजय बेर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शासकीय कार्यपद्धतीचा प्रदीर्घ अनुभव, सामाजिक कार्याची आवड व सर्व पदाधिकाऱ्यांच्या साथीने दापोली मंडणगड पेंशनर सभासदांना न्याय मिळवून देणे व शासकीय कामे मार्गी लावून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास व घटनात्मक तरतुदी अन्वये कामकाज करणेस कटीबद्ध असल्याबाबतचे मनोगत अध्यक्ष शिवाजी कदम यांनी व्यक्त केले. सर्व सभासदांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*