दापोली:- सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गडकोट संवर्धनाचे काम गेली १४ वर्ष संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्क्यांच्या संवर्धनासाठी गेली ४ वर्ष कार्य जातात असून आजवर मंडणगड , बाणकोट किल्क्यांवर तोफांना तोफगाडे बसविण्यात आले व अनेक दुर्गसंवर्धन माहिमांचे आयोजन करण्यात आले आहे , खेड तालुक्यातील रसाळगड किल्क्यांवर दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी दुर्गसंवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आली , या मोहिमेदरम्यान गडाच्या दक्षिण दिशेकडील दरीमध्ये ४०० फूट खोल दरीमध्ये अर्धा टन वजनाची व ५ फूट लांबीची तोफ अवघ्या ४ तासात संस्थेच्या ३५ दुर्गसेवकांनी तोफ गडावर आणली व गडावरील झोलाई देवीच्या मंदिरासमोर तोफ ठेवण्यात आली. कित्येक वर्षांपासून हि तोफ दरीमध्ये पडून दुर्लक्षित होती या तोफेस आज गडावर विराजमान झाली असून आता ही तोफ पर्यटक पाहू शकतात. सध्या या गडावर एकूण १८ तोफा आहेत. हा किल्ला जिल्ह्याच्या पर्यटन विकास दृष्टीने महत्वाचा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशभर साजरी होत आहे. शिवजयंतीचे औचित्य साधत आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रणालकदुर्ग (पन्हाळेकाजी) येथील गावी पन्हाळेकाजी लेणी येथून काही अंतरावर असलेल्या प्रणालकदुर्ग किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गसेवक व पन्हाळेकाजी ग्रामस्थ यांनी किल्यावर स्थापित केलेल्या अर्धाकृती पुतळ्यास दुग्धाभिशेक घालुन पुष्पाहार अर्पण करण्यात आले. सदर मोहिमेला श्री. प्रदिप विक्रम जाधव (समाजसेवक), बाळकृष्ण विठोबा जाधव (पोलीस पाटील, पन्हळेदुर्ग) विशेष सहकार्य म्हणून पूर्वी पाडलेकर, प्रियांका लाड, रचना मथे व कोमल चव्हाण यांचे सहकार्य लाभले तसेच या मोहिमेच्या नियोजनात ललितेश दिवटे, नंदकुमार झाडेकर, राजेश हरावडे, अमित महाडिक नियोजनात सहभागी होते. तसेच या मोहिमेत ओमकार मोरे, सुयोग तेरेकर, विश्वनाथ बेर्डे, प्रतिक शिर्के, साहिल पांचाळ, प्रशांत कालेकर, अर्णव महाडिक, गणेश जाधव, सुशांत कालेकर, मयुरेश तांबूटकर, महेंद्र जाधव, अथर्व जाधव, अमोल गुरव, मंथन चोगले इत्यादी दुर्गसेवक उपस्थित होते.