अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित पद्धतीने तातडीने पगार सुरू करावेत या मागणीसाठी आज शिक्षक भारतीचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले .

सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नियाज पटेल, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष असलम बारगीर, सांगली जिल्हाध्यक्ष अशरफ मोमीन यांनी आपल्या जिल्ह्यात निवेदनं दिली.

आंदोलनात सांगली , कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्य़ातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील हजारो शिक्षक व शिक्षकेतर बांधव जुनी पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करावी व प्रचलित पद्धतीने अनुदान वितरीत करुन विनाअनुदानित व टप्पा अनुदानावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचलित पध्दतीने पगार सुरू करावा अशा आशयाची निवेदने मेलद्वारे व पोष्टाने पाठविले आहेत.

आज सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोन मागण्यांचे फलक हातात घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काढलेले हजारो फोटो व्हाट्सऍप, फेसबुक, ट्विटर वरुन व्हायरल होत आहे.

Teacher protestशिक्षक मुबीन बामणे

या पोस्टर आंदोलनात खास करून महिला शिक्षक भगिनींचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक भारती ऊर्दू विभागाचे राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल, राज्य उपाध्यक्ष प्रा. नेमिनाथ धनपाल बिरनाळे, राज्य उपाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री.धनाजी पाटील, रत्नागिरी जिल्हा सचिव श्री. निलेश कुंभार, उर्दू चे राज्य सचिव मुबीन बामणे, राज्य कोषाध्यक्ष फैसल पटेल, शिक्षक नेते मा. जे. एस आप्पा पाटील, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष बीपीन पाटील, लियाकत हवालदार,यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनं देण्यात आली.