दापोली (प्रतिनिधी) – ऑडीट व इन्स्पेक्शन मधील अनुभवी व्यक्ती म्हणून पत्रकार चंद्रशेखर शशिकांत जोशी, बँकिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती म्हणून रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील गुरव आणि कायदाक्षेत्रातील अनुभवी व्यक्ती म्हणून ॲड विकास मेहता यांची दापोली अर्बन बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
दापोली अर्बन बँकेने दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी सदस्यपदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून दापोली अर्बन बँकेच्या २७ स्पटेंबर २०२३ च्या सभेत तिघांच्या नावांना मंजूरी देण्यात आली. चंद्रशेखर जोशी, सुनील गुरव, ॲड. विकास मेहता यांची व्यवस्थापकीय समितीवर सदस्य म्हणून २८ स्प्टेंबर २०२३ ते ०९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचबरोबर व्यवस्थापकीय समितीवर संचालकांमधूनही ३ सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये संचालक सीए संदीप खोचरे, संचालक निलेश जालगावकर आणि संचालक अशोक जाधव यांचा समावेश आहे.
आरबीआयनं बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यांचा रोल निश्चित केलेला आहे. त्यानुसार या समितीला कार्य करावे लागणार आहे. दापोली अर्बन बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यपदी नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचं अभिनंदन होत आहे.
मी बँकेमध्ये कधीही राजकारण आणत नाही. त्यामुळे जात, धर्म, पक्ष न पाहता जी व्यक्ती योग्य काम करेल अशांना याठिकाणी संधी दिली जाते. ज्यांना चांगलं काम करायची इच्छा आहे, त्याचं मी नेमहीच स्वागत करत आलो आहे. यावेळची निडवणूक सभासदांनी बिनविरोध केल्यामुळे आमच्यावर जास्त मोठी जाबाबदारी पडली आहे. त्यामुळे अतिशय जबाबदारीने काम करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. लोकांच्या ठेवी सुरक्षीत कशा राहतील. बँक अधिक जोमाने कशी पुढे जाईल हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन संचालक मंडळ काम करत आहे. व्यवस्थापकीय समितीवर केल्या गेलेल्या नियुक्त्या सर्व संचालक मंडळानं एकमताने केल्या आहेत. आम्ही व्यवस्थापकीय समितीवर नियुक्त झालेल्या सर्वच्या सर्व सदस्यांचे स्वागत आणि अभिनंदन करत आहोत.
– जयवंत जालगावकर, अध्यक्ष – दापोली अर्बन बँक