राजापूर : सोमवारी राजापूर पेट्रोल पंपाबहेर पत्रकार शशिकांत वरीसे यांच्या मोटारसायकलला थार गाडीनं धडक देऊन जखमी केलं होतं. या अपघातामध्ये जखमी झालेले शशिकांत वरीसे यांचा कोल्हापूरमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.
या अपघाता प्रकरणी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर राजापूर पोलीस स्थानकात भा.द.वी. कलम ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आता पोलीसांनी भा.द.वी. कलम 300 सुद्धा लावण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. या अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसे या पत्रकाराच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे.

काल सकाळी ८ वा. ३ मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. मोदिजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो अशा आशयाच्या बातमीचे कात्रण वारीसे यांनी सकाळी टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या बॅनर संदर्भात हि बातमी होती.
यानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर वेगात येणाऱ्या महेंद्र थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले.
नातेवाईकांचा आरोप
वारीसे यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपावरून कार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते. सकाळी जो पत्रकार विरोधातील बातमीची पोस्ट टाकतो त्याच्याच गाडीला दुचाकीची धडक बसून त्याचा यामध्ये मृत्यू होतो हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याचबरोबर जो पर्यंत आरोपीवर 302 कलम लावलं जात नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा ही नातेवाईक घेण्याची शक्यता आहे.