रत्नागिरी:- संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष पदी रत्नागिरी चे शकील गवाणकर यांची निवड करण्यात आली.
गेली चार वर्षे अविरतपणे सामाजिक कार्य करीत असलेल्या या संस्थेने कोरोना कालावधीत मोलाचे कार्य केले असून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात या संस्थेचे रुग्ण मदत केंद्र आहे.या मदत केंद्राचे माध्यमातून या रुग्णालयात येणा-या गोरगरीब,दिव्यांनी तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक यांना सहकार्य करुन त्यांना योग्य मार्गदर्शन विनामूल्य गेली चार वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
शकील गवाणकर हे सहकार चळवळीत गेली 25 वर्षे कार्यरत असून ते पत्रकार आहेत.या संस्थेच्या स्थापनेपासून संस्थापक दिलावर कोंडकरी यांचे सोबत ते काम करीत आहेत.दुर्देवाने दिलावर कोंडकरी यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्त होती.त्यामुळे अध्यक्ष पदासाठी शकील गवाणकर यांची निवड करण्यात आली.
शकील गवाणकर हे उत्तम संघटक असून त्यांच्या अनुभवाचा उपयोग संस्थेच्या कामकाजात नक्कीच होईल असा विश्वास रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष निलेश नार्वेकर, तसेच मुख्य कार्यकारिणी उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर,मुकेश गुंदेचा यांनी व्यक्त केले. आपल्यावर विश्वास ठेवून अध्यक्षपदाची धुरा दिल्याने आता जबाबदारी वाढली असून सर्व पदाधिकारी आणि सभासद यांना सोबत घेऊन आपण कार्य करु आणि संस्थापक दिलावर कोंडकरी यांचे स्वप्न साकार करुन त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार काम करु असा विश्वास व्यक्त केला.यावेळी रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे, सल्लागार सुहेल मुकादम, सचिव युसुफ शिरगावकर, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर, जिल्हा संघटक विलास सावंत,नागेश बेर्डे, उपाध्यक्ष दिलिप रेडकर, महिला संघटक निकहत डिंगणकर, ॲड सुप्रिया सावंत,जैबा बंदरकर,नसीमा खान उपस्थित होते.यावेळी रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष पदी आदील फणसोपकर यांची निवड करण्यात आली.