रत्नागिरीच्या कोकण नगरात शबे कद्र उत्साहात साजरी

रत्नागिरी – दावते इस्लामी शाखा रत्नागिरीच्या वतीने कोकण नगर येथे शबे कद्र हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सध्या सुरू असलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील २६ व्या दिवशी शबे कद्र साजरी केली जाते.

या रात्री नमाज पठण आणि दुवा करण्याची प्रथा आहे.शबे कद्रला अरबी भाषेत ‘लैलतूल कद्र’ असे संबोधले जाते.

इस्लाम धर्मात रमजान महिन्यातील ही एक विशेष रात्र मानली जाते. या रात्रीला ‘मुकद्दर की रात’ आणि ‘भाग्यशाली रात्र’ असेही म्हणतात.

मुस्लिम धार्मिक मान्यतेनुसार, या रात्री अल्लाहची प्रार्थना करून पापांचा पश्चात्ताप केला जातो आणि असे मानले जाते की, या रात्री याचकांच्या पापांना माफी मिळते.

रमजानच्या शेवटच्या दहा रात्रींपैकी २१, २३, २५, २७ आणि २९ तारखांना शबे कद्र साजरी केली जाते.

मुस्लिम समाजाच्या विश्वासानुसार, या रात्री अल्लाहने आपला दूत जिब्राईल यांच्यामार्फत प्रथम कुराण पैगंबर मोहम्मद यांच्याकडे पाठवले.

शबे कद्रला इंग्रजीत ‘नाइट ऑफ डिक्री’, ‘नाइट ऑफ पॉवर’ आणि ‘नाइट ऑफ व्हॅल्यू’ असेही संबोधले जाते.

ही रात्र रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांतील कोणतीही एक रात्र असू शकते.

या प्रसंगी रमजानचे पूर्ण ३० रोजे ठेवणाऱ्यांचा तसेच फैजाने अत्तारच्या इमामांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे सदस्य उवेज जरीवाला, अल्ताफ कुरेशी, अकील मेमन तसेच ख्वाजा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचे रत्नागिरी अध्यक्ष फारूक जरीवाला आणि साजिद मेमन उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*