रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळले

मुंबई:- रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे हे समजून घेण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी महाराष्ट्रात डेल्टा-प्लस व्हेरिएंटमुळे करोनाची तिसरी लाट येऊ शकते असे तज्ञांनी सांगितले होते. भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या करोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे. मोनोक्लोनल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही समजून घेण्यासाठी संशोधन चालू आहे.आम्हाला नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा-प्लस सापडला. त्यानंतर, आम्ही आणखी नमुने पाठविले, अंतिम अहवाल अपेक्षित आहे, “असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सांमत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने काही गावांत प्रतिबंधक केलेल्या क्षेत्रात काेराेनाचा नवीन स्टेन आहे का ही शक्यता आरोग्य खात्याकडून व व प्रशासनाकडून पडताळी जात असल्याचे सांगितले हाेते त्या दृष्टीने रत्नागिरी प्रशासनाबरोबर महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांची बैठकही पार पडली होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*