अनिल देशमुख यांना रात्री उशिरा अटक

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या वसुली प्रकरणी (Anil Deshmukh Arrest) सक्तवसुली संचालनालयानं (ED) अटक केली आहे. अटक करण्यापूर्वी अनिल देशमुख यांची १३ तासांच्या दीर्घ चौकशी करण्यात आली होती. बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी स्वतःहून ईडीसमोर हजर झाले होते. सत्यमेय जयते असा ट्विट देखील त्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता.

अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे देखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी ७.३० सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. यानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुख यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी सुमारे ५ वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तब्बेत आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचे टाळले, असे सांगितले जात आहे.

काय आहेत आरोप?

अनिल देशमुख पोलीसांना १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगायचे. मुंबईतील बार रेस्टॉरंटमधून वसुली करण्यास सांगायचे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पोलीसांना बंगल्यावर बोलवायचे, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*