निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया पहा काय? म्हणाले

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच आम आदमी पक्षानं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे निवडणुकींच्या कलांनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल्याचं निश्चितच झालं.

आपनं जवळपास 90 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. यावर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. दिल्लीतील कामगिरीमुळे आपचा पंजाबमध्ये विजय मिळाला आहे असे पवार म्हणाले…

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची चूक अजिबात वाटत नाही

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची चूक अजिबात वाटत नाही. ते उत्तर प्रदेशात एकटे लढले आहेत. तिथे, जी मत त्यांना पडलीत त्याचा त्यानं सकारात्मक विचार करावा, ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास आहे ते माझ्यासारखे लोक या निकालाच स्वीकार करतील. मिनिमम कॉमन प्रोग्रामनुसार पुन्हा कामं सुरू करावी लागतील असं शरद पवार म्हणाले आहेत.

माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही ‘आप’ला मतं दिली

दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबमध्ये आपला स्वीकारलं. पंजाब वगळता इतर राज्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना कौल मिळाला आहे. दरम्यान दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचा-यांनीही ‘आप’ला मतं दिली होती. पंजाबच्या शेतक-यांत केंद्र सरकारविषयी राग होता. 5 पैकी 4 राज्यात भाजपचं राज्य होतं. पंजाबमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. तिथला बदल भाजपला अनुकूल नाही. हा बदल काँग्रेसला झटका देणारा आहे. काँग्रेसची स्थिती पंजबामध्ये चांगली होती. मात्र जे बदल झालं ते जनतेनं नाकारलेत. अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणं काँग्रेसची चूक झाली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*