दापोली नॅशनल हायस्कूलमध्ये वार्षिक शैक्षणिक प्रदर्शन संपन्न

दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात वार्षिक शैक्षणिक प्रदर्शन पार पडले.

एकूण दहा दालनांचे उद्घाटन अनुक्रमे गिम्हवणे केंद्राचे प्रमुख सुनील कारखिले, गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, सचिव इकबाल परकार, यु. ए. दळवी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका नुजहत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, मुनाफ वाडकर, माजी केंद्रप्रमुख मंगला सणस, उद्योगपती मोहम्मद अब्दुल शकुर काझी यांच्या हस्ते करण्यात आले.

या शैक्षणिक प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला होता. इयत्ता पाचवीपासून ते ज्युनिअर कॉलेज पर्यंत सर्व विषयांचे गणित, विज्ञान, इंग्रजी, उर्दू , मराठी, हिंदी, सामाजिक शास्त्र, चित्रकला व कॉलेजच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स आदिचे प्रदर्शन भरविण्यात आलेले होते.

यामध्ये शंभराहून अधिक शैक्षणिक साधनांचा समावेश होता. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतीची निर्मिती केलेली होती.

या प्रदर्शनास दापोली शहरातील लोकमान्य हायस्कूल, यु. ए. दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूल, कोकणी इंग्लिश मीडियम हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा आदि शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन कुतूहलाने बनवलेल्या शैक्षणिक साधनांची पाहणी करत विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले.

या शैक्षणिक प्रदर्शनास दापोली शहराचे गट विकास अधिकारी सुनील खरात, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखिले यांनी सदिच्छा भेट देत, प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

लोकमान्य हायस्कूलच्या मुख्याध्यापिका काजल राऊत, कोकणी इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक अश्रफ अंजर्लेकर, नॅशनल हायस्कूल मांदवलीचे मुख्याध्यापक फैयाज वलेले अशा विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटीचे चेअरमन आरिफ मेमन, इसहाक मुरुडकर, हमीद बांगी, गफ्फार मेमन, मुनाफ वाडकर आदि संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

वैज्ञानिक साहित्या बरोबरच भाषेचीही शैक्षणिक साधन निर्मिती केल्याने अनेकांनी कौतुकांचा वर्षाव केला. एक अनोखे शैक्षणिक प्रदर्शन म्हणून मान्यवरांनी गौरव केला.

पालकांची उपस्थिती ही दर्शनीय होती. अशा शैक्षणिक प्रदर्शनातूनच देशासाठी उत्तम शास्त्रज्ञ घडतील असे सुनील खरात यांनी उद्गार काढले.

दापोली तहसील ऑफिसचे नायब तहसीलदार शारदकुमार आडमुठे यांनीही या प्रदर्शनाची पाहणी करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

उत्तम नियोजन, शिक्षक व विद्यार्थ्यांचे परिश्रम यामुळेच हे प्रदर्शन यशस्वी संपन्न झाले, असे प्रशालेचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*