दापोली : तालुक्यातील न्यू इंग्लीश स्कूल दमामे येथील विक्रम साराभाई नगरीत शालेय समितीचे अध्यक्ष विनोद खेडेकर यांचे अध्यक्षतेत गटविकास अधिकारी सुनिल खरात, गट शिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांचे प्रमुख उपस्थित विज्ञान दिंडीने विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन संपन्न झाले.

सुरुवातीला ए.पी.जे अब्दुल कलाम, विक्रम साराभाई आदि शास्त्रज्ञांच्या वेशभूषेत असणार्‍या विद्यार्थ्यासह पालखीने जि.प.मराठी शाळा दमामे येथून ढोलताशा,
खालूबाजाच्या गजरात लेझीम पथकाने दिंडी काढणेत आली.

यामध्ये कोणताही भेद न करता सर्व अधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते प्रतिमापूजन करणेत आले. याप्रसंगी महेश शिंदे आणि विजय भारदे यांच्या साथ संगितात शाळेतील विद्यार्थिनींनी सुस्वर ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.

यावेळी नासा आणि इस्त्रो साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह शास्त्रज्ञ वेशभूषेत असलेल्या मुलांचाही भेटवस्तू देऊन गौरव करणेत अला. अंतराळ क्षेत्रात आपल्या देशाने या वर्षी उत्कृष्ठ कार्य केले आहे.

चांद्रयान तसेच आदित्य एल 1 मोहिमेमुळे आपल्या देशाची ओळख विकसीत भारत अशी झाली असून समाजासाठी विज्ञानाचा वापर कसा करावा याचे दर्शन आजच्या विज्ञान प्रदर्शनात पहायला मिळेल अशी आशा व्यक्त करत, विज्ञानाच्या वाटेवर जो जातो त्याची प्रगती नक्कीच होते.

आधुनिक यंत्रांच्या वापरांनी होणारे दुष्परिणाम ओळखून
समाजावर जे विपरीत परिणाम होतात, ते वेळीच ओळखून समाज विकास साधता आला पाहिजे,तसेच कोणतीही स्पर्धा ही खेळीमेळीत पार पाडावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी प्रास्ताविकात केले.

तर प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी सुनिल खरात यांनी विकसित भारत संकल्प यात्रा,यशस्वी करावी अशा सुचना देत जिज्ञासूवृत्ती आणि शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन यामुळेच मुलांची ईस्त्रो नासा साठी मुलांची निवड होत आहे.

मुलांमध्पे उपजत असलेल्या गुणांना आकार देण्याचे काम सर्व गुरुजनांकडून होत आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.शेवटी स्वागताध्यक्ष विनोद खेडेकर यांनी पहिल्या दिवसाचा सर्व आढावा घेत विद्यार्थी व सर्व शिक्षकांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.

यावेळी सरपंच अर्पिता शिगवण,उपसरपंच गंगाराम हरावडे, भडवळे, कात्रण आदि पंचक्रोशीतील सरपंच, तसेच दिलेली कोणतीही जबाबदारी यशस्विपणे पार पाडणारे, गावतळे प्रभागाचे विस्तार अधिकारी बळीराम राठोड, नोडल ऑफीसर पद्मन लहांगे, रामचंद्र सांगडे, जय दरेकर आदि विस्तार अधिकारी यजमान शाळेचे मुख्याधिकारी अतुल पिटले सर्व केंद्रप्रमुख, तालुक्यातील असंख्य शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.दमामे तामोड गावातील ग्रामस्थांची उपस्थिती व सहकार्य तसेच नियोजन अगदी नेटके होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय मेहता, संदेश राऊत, अनुराधा देसाई, नितीन गुहागरकर, नंदकुमार कालेकर आदिंनी केले. दुपारनंतर प्रत्यक्ष परिक्षण करणेत आले. यावेळी संपूर्ण चांद्रयान मोहिमेचे चलचित्र आकर्षण ठरले.