करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेची स्थापना

दापोली : तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजानी येथे विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या समस्या, कल्पना आणि गरजा शाळेच्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व, संघटन कौशल्य आणि सामूहिक जबाबदारीची भावना विकसित करण्याची संधी मिळते.

२३ जून २०२५ रोजी शाळेत विद्यार्थी परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत शाळेचे चेअरमन सुजय मेहता, मुख्याध्यापिका रितू मेहता, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. निवडणुकीचा निकाल २७ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आला.

निकालानुसार, शाळेचा प्रमुख विद्यार्थी म्हणून साईप्रसाद उत्पल वराडकर आणि प्रमुख विद्यार्थीनी म्हणून हुमेरा कासम मेमन यांची निवड झाली. उपप्रमुख म्हणून शिवतेज सत्यजित ठोंबरे आणि अनुष्का शैलेश भैसारे यांची निवड झाली. शिस्त समन्वयक म्हणून प्रयाग विलास भांबुरे आणि सृष्टी सदाशिव कुंभार यांची, तर क्रीडा कर्णधार म्हणून सर्वेश रुपेश शिंदे आणि दिक्षा दत्ताराम भारदे यांची निवड झाली. सांस्कृतिक प्रमुख म्हणून श्रियान्स सुजय मेहता आणि भूमी अमोल दरीपकर यांची निवड झाली.

आकाश घराचा कर्णधार म्हणून नजीफ चौगुले आणि रिधिमा काळे, अग्नी घराचा कर्णधार म्हणून वेदांत शेट्टे आणि स्वरा तुपे, पृथ्वी घराचा कर्णधार म्हणून फरहान शेख आणि ऋचा करंदीकर, तसेच त्रिशूल घराचा कर्णधार म्हणून हाजीक महालदार आणि देवांशी भगत यांची निवड झाली.

शाळेचे चेअरमन सुजय मेहता आणि मुख्याध्यापिका रितू मेहता यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*