संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

दापोली:- संतोषभाई मेहता इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोलीमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला विद्यार्थ्याचा चांगला प्रतिसाद लाभला. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यानी इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांचे वेशभूषा सादरीकरण केले. तसेच इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यानी एकपात्री अभिनय सादर केले.
पोवाडा सादरीकरणात इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यानी प्रतागडावरील पराक्रम, तानाजी मालुसरे यांची कोंढाणा मोहीम व इतिहास स्वराज्य स्थापनेचा आदी पोवाडे सादर केले. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यानी शिवरायांच्या जीवनावर आधारीत नृत्य सादर केले.

कार्यक्रमाला संस्थाध्यक्षा श्रीम.सरोज मेहता, सेक्रेटरी सुजय मेहता, संचालक सुयोग मेहता, संकेत मेहता उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.चंदाली पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*