मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पणदेरी हायस्कूलची सानिका कोबनाक हिचं यश

मंडणगड – पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल पणदेरीच्या इ.9 वी मधील विद्यार्थिनी सानिका सचिन कोबनाक हिने मैत्री फाऊंडेशन मंडणगड व एस एस कन्स्ट्रक्शन मंडणगड यांच्या वतीने दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.

या स्पर्धेत तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत सराव करणाऱ्या मात्तब्बर खेळाडूंना धोबीपछाड देत विजय खेचून आणला. विशेष म्हणजे ती अनवाणी, पायाला खडे टोचत असताना देखील धावत होती.

मंडणगड छत्रपती शिवाजी चौक ते पालवणी फाटा गांधीचौक मार्गे नगरपंचायत अशी 3 km ची ही स्पर्धा होती. बराच काळ ती 1 नंबर वर होती परंतु वेदना असह्य झाल्यामुळे ती काही काळ थांबली त्यामुळे तिच्या पुढे काही स्पर्धक गेले.

अखेर पणदेरी पंचक्रोशी मातीचा हार न मानण्याचा गुण दाखवून तिने तिसरा क्रमांक अक्षरशः खेचून आणला. तिने खुल्या गटातून खेळून सर्वांची वाहवा मिळविली.

तिच्या जिद्दिची चर्चा स्पर्धा संपल्यावर देखील चालू होती. 777/- ₹ रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिचा संयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तिला विद्यालयाचे शिक्षक राजेश इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या या यशाबद्दल संस्था, शालेय समिती अध्यक्ष, सदस्य, प्रशालेचे प्र. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*