सांगली – साताऱ्यात दिसला दुर्मिळ बुलफ्रॉग (पिवळा बेडूक)

सांगली :- पिवळे बेडूक दिसायला लागल्यानंतर पाऊस चांगला पडेल असं मानलं जातं. मादी बेडकाने अंडी दिल्यानंतर त्यातून बेडूक बाहेर येईपर्यंत पावसाचा जोर चांगला राहतो असं मानलं जातं. बेडूक हा माणसासाठी अनेक अंगानी मदतशीर मानला जातो.

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषण, अधिवास क्षेत्राचा ऱ्हास या कारणांमुळे बेडकांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. ज्या परिसरात बेडकांची संख्या अधिक तिकडे पर्यावरणाचा समतोल चांगल्या पद्धतीने राखला जातो असं मत अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. प्राणी अभ्यासक सागर कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा पिवळा बेडूक, भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, मालदीव, श्रीलंका या भागांमध्ये आढळून येतो. इतर बेडकांच्या तुलनेत हा बेडूक मोठा आणि वजनदार असतो, इंग्रजीत याला बुलफ्रॉग म्हटलं जातं. गोड पाण्याच्या पाणथळ जागा, नदी, तलाव, ओढे, डबकी अशा ठिकाणी बेडूक दिसून येतो. साताऱा आणि  सांगलीतील कूपवाड रोडवरील अकुजनगर भागातही हे पिवळे बेडूक दिसून आले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*