रायगड : गोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पदनियुक्ती सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी पक्षामध्ये नाव्यानं दाखल झालेल्यांना राष्ट्रवादी पक्षानं महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. संदीप राजपुरे यांच्यावर विश्वास दाखवत पक्षानं प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे.

खेडचे शंकर कांगणे यांची रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दत्ताराम गोठल यांची खेड तालुका कार्यअध्यक्षपदी निवड केली गेलीये तर विकास जाधव यांची रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी निवड करून त्यांना सन्मानपूर्वक पत्र देऊन नियुक्ती केली.

संदिप राजपुरे यांनी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार, अजित पवार साहेब, सुनील तटकरे, दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांचे आभार मानले. त्यांचा विश्वास सार्थ करत महाराष्ट्रभर पक्षवाढीसाठी जोमाने काम करण्याचे आश्वासन देखील राजपुरेंनी दिलं.
या कार्यक्रमात रत्नागिरी-रायगड खासदार सुनिल तटकरे, माजी आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, दापोली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष मुजीब रूमाणे, मंडणगड पंचायत समिती सभापती दौलत पोस्टुरे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रमेशराव दळवी,ओबीसी सेलचे सचिव प्रकाश शिगवण, खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम, दापोली तालुकाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक जयवत जालगावकर, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, मंडणगड तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, दापोली युवक तालुकाध्यक्ष विजय मुंगशे, धिरज पटेल, अक्षय बेलोसे, विराज जोशी, अनिरूध्द कदम तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
