खेड: “सॅल्यूट द सायलेंट” या उपक्रमांतर्गत जेसीआय खेडने खेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.
समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना दरवर्षी जेसीआयकडून या उपक्रमांतर्गत गौरविण्यात येते.
दैनंदिन जीवनात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
खेड पोलीस वाहतूक विभागातील नंदकुमार घनकर आणि संपत गीते यांना “सॅल्यूट द सायलेंट” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष अमर दळवी, माजी अध्यक्ष आनंद कोळेकर, प्रमोद कांबळे, सचिव कपिल कोळेकर, सदस्य डॉ. श्याम गिल्डा, रोहित ओतारी, डॉ. दिग्विजय पवार आणि कार्यक्रम समन्वयक स्वप्नील कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.