दापोलीतील ज्येष्ठ व्यापारी मुस्तफा खान यांचं निधन

दापोली : शहरातील भारत बेकरीचे मालक व ज्येष्ठ व्यापारी मुस्तफा मुसा खान यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.

मुस्तफा खान हे परोपकारी व धार्मिक वृत्तीचे व दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते. ते सर्व समाजातील गरिबांना वेळोवेळी मदत करत असत. माय कोकणचे संपादक मुश्ताक खान, पत्रकार समशाद खान व उद्योजक इम्रान यांचे वडील होते.

शिक्षणाबाबत ते प्रचंड आग्रही होते. आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रत्येकाला प्रोत्साहन दिलं. त्यांची दोन मुलं पीएचडी आहेत. एक मुलगा वकील आहे. एक इंजिनिअर आणि एक प्राध्यापक आहे. उर्वरित ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, 7 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*