खेड : शहरातील साळीवाडा येथील माजी नगरसेवक रमेश रामकृष्ण भागवत यांचे ६८ व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, जावई, नातवंडे, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते गेली अनेक वर्षे सक्रिय सहभागी होते. अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झाले होते.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासोबत ते भाजप व संघात काम करत होते.

खेड नगरपरिषदेत ते दहा वर्षे भाजपचे नगरसेवक होते. या काळात त्यांनी मुलभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिल्या.

संघ परिवार व भाजप, मंदिर समिती सदस्य, हिंदू जनजागृती समिती अशा विविध संस्थेशी ते जोडलेले होते. अन्य राजकीय पक्षातही त्यांचा मित्र परिवार मोठा होता.

गेली काही दिवस ते आजारी होते. त्यांना उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे येथे दाखल केले होते. बुधवारी, रात्री त्यांची प्राणज्योत मावळली.

गुरुवारी, त्यांचेवर खेड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातील संघ व भाजपचे सहकारी उपस्थित होते.

भागवत हे मनमिळावू, शांत व संयमी होते, असे अनेकजण सांगत होते.