दापोली : तालुक्यातील म्हाळुंगे इथं आपल्या दुचाकीवरून दापोलीला येत असताना अपघात होऊन दापोली अर्बन बँकेचे संचालक चंदू कळसकर यांचं निधन झालं आहे. या घटनेनं दापोलीमध्ये शोककळा पसरली आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, त्यांना उपजिल्हा रूग्णालयात आणल्याच्या काही वेळातच त्यांची प्राण ज्योत मालवली. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे मेंदूच्या आतील भागातून रक्तस्त्राव झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दापोली उपजिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्याला यश येऊ शकले नाही.
चंदू केळसकर हे दापोलीतील प्रतितयश सायकल व्ययसायिक. दापोलीतील श्रीकांत सायकल मार्ट त्यांनी यशवीरित्या चालवलं. त्यांनी आपल्या आयुष्यात प्रचंड संघर्ष करून यश मिळवलं होतं. पान टपरीचा व्यवसाय देखील त्यांनी केला होता. दापोली अर्बन बँकेचे ते 2 टर्म संचालक राहिले होते. 1999 ते 2004 आणि 2016 ते आजतागायत ते संचालक होते. दापोली बिगरशेती ग्रामीण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी देखील त्यांच्या चांगलं कार्य केलं होतं. खेर्डी विविध कार्यकारी सोसाटीचे ते अध्यक्ष होते. दापोली खरेदी विक्री संघाचे देखील ते सदस्य देखील होते. सहकारातल्या विविध पदांवर त्यांनी आपला ठसा उमटवत जनतेची कामं करून घेतली होती. खऱ्या अर्थाने समाजसेवक म्हणून त्यांचं कार्य राहिलं आहे.
अतिशय मनमिळावू, शांत स्वभावाचे, कायम हसतमुख असणारे चंदू कळसकर यांच्या आशा अचानक जाण्याने अनेकांनी आपलं दुःख प्रकट केलं आहे.
चंदू कळसकर यांचं जाणं ही माझी वैयक्तिक हानी – जयवंत जालगावकर
दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
चंदू केळसकर यांच्या जाण्याने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. आमचे अतिशय जवळचे म्हणजे घरगुती संबंध होते. दापोली अर्बन बँकेतही त्यांनी उत्तम काम केलं आहे. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राचं मोठं नुकसान आहे. माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.