कोरोना संकट आणि त्यात लसीचा तुटवडा या संकटाच्या काळात देशासाठी आज एक चांगली बातमी समोर आली आहे. रशियन लस स्पुटनिक V लसीची पहिली खेप आज भारतात पोहोचली आहे. रशियावरुन खास विमानाने स्पुटनिकची ही लस हैदराबादला दाखल झाली. कोरोना विरुद्ध ही लस अधिक प्रभावी असून या लसीचे डोस उपलब्ध झाल्याने भारतात लसीकरणाला गती मिळणार आहे. लसीकरणाला गती देण्यासाठीच केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी स्पुटनिक V लसीला आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती.