संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये रशियाच्या हल्यात आतापर्यंत 27 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. रशियाने 24 फेब्रुवारी पासून युक्रेनमध्ये हल्ले सुरू केले आहेत. यात 406 जणांचा मृत्यू झाला. तसेच 42 चिमुकल्यांसह 801 जण जखमी झाले आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर रशिया मध्ये युद्ध विरोधात आंदोलन करणाऱ्या 12 हजार 700 जणांना अटक करण्यात आली आहे.