मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आज बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला असल्याची माहिती आहे. चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद देखील आहे. त्याचवेळी त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष देखील होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या राजीनामा देणार अशी चर्चा होती. अखेर चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीकडून लवकरच नव्या महिला अध्यक्षाची घोषणा होईल, अशी माहिती मिळत आहे.