पाडले (वार्ताहर): छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पाडले भंडारवाडा ग्रामस्थांनी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ९वी तील विद्यार्थी रुद्र मंगेश जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला.
रुद्रने यापूर्वी २०२१ मध्ये याच स्पर्धेत इयत्ता ५वी ते ८वी गटात प्रथम क्रमांक मिळवला होता.
यंदाही त्याने आपल्या वक्तृत्वाने परीक्षकांची मने जिंकली. स्पर्धेचे परीक्षक प्रा. कुणाल मंडलीक यांनी रुद्रच्या वक्तृत्वाची प्रशंसा केली.
सूत्रसंचालक म्हणून उत्कर्ष कर्देकर यांनी कार्यक्रमाला रंगत आणली.
या स्पर्धेत एकूण ३० स्पर्धकांनी भाग घेतला होता. रुद्रच्या या यशाबद्दल त्याचे शिक्षक, मित्र आणि कुटुंबीयांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका रितू मेहता आणि संचालक सुजय मेहता यांनीही रुद्रला शुभेच्छा दिल्या.
रुद्रने यापूर्वीही वक्तृत्व, अभिनय, चित्रकला आणि स्केचिंग स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे जिंकली आहेत.
त्याची आई मधुरा जाधव आणि वडील मंगेश जाधव यांनी पाडले भंडारवाडा ग्रामस्थांचे आभार मानले.