ट्रेनमध्ये मोबाईल चोरणारा चोरटा रत्नागिरी RPFच्या ताब्यात

रत्नागिरी : कोकण रेरल्वेच्या मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 10104 मांडवी एक्सप्रेसमध्ये  TTE मंगेश साळवी यांच्या सतर्कतेमुळे एका चोराला पकडण्यात यश आलं आहे.

मंगेश साळवी यांना ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची हालचाल संशयास्पद वाटली. त्या संशयास्पद व्यक्तीला हटकल्यानंतर तो थोडा घाबरल्यानं यांचा संशय आणखी बळावला.

त्या व्यक्तीची झडती घेतल्यावर त्याच्यकडे 6 मोबाईल फोन, चोरीच्या काही बॅगा आढळल्या. अखेर त्या संशयास्पद व्यक्तीला चोरीच्या साहित्यासह रत्नागिरी RPFच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

TTE मंगेश साळवी यांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*