रत्नागिरी : राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ अनिल परब जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार 25 जानेवारी 2022 रोजी रात्रौ 10.20 वाजता मुंबई येथून केसीव्हीएल सुपरफास्ट एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण.  रात्रौ 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व मुक्काम. 

बुधवार 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.10 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून शासकीय मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम, रत्नागिरीकडे प्रयाण.  सकाळी 9.15 वाजता प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती.  (स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम, रत्नागिरी).  सायंकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून शासकीय मोटारीने चिपळूणकडे प्रयाण.  रात्रौ 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह चिपळूण येथे आगमन व राखीव. 

गुरुवार 27 जानेवारी 2022 रोजी राखीव.  सोईनुसार चिपळूण जि. रत्नागिरी येथून शासकीय मोटारीने मुंबईकडे प्रयाण.