महसूलमंत्री बाळासाहेब थोरात मोफत लसीकरणासाठी देणार आपले एका वर्षाचे मानधन

मुंबई: राज्यातील कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. दरम्यान आता राज्याच्या तिजोरीवर बोजा पडत आहे. असे असताना आपले वर्षभराचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याची घोषणा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज केली आहे. यासोबतच मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीचे एकमत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आम्ही लसीकरणाबाबत आग्रही आहोत. मात्र लसीकरणासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. यामुळेच मी माझे वर्षभराचे मानधन राज्यासाठी देणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*