रत्नागिरी – कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणतर्फे आयोजित भव्य कोकण विभागीय काव्य स्पर्धेचा निकाल स्वातंत्र्य दिनी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत ५०२ कवींनी सहभाग नोंदवला होता. दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी या स्पर्धेचं प्रायोजकत्व स्विकारलं होतं.

योगेश कदम, आमदार (प्रायोजक)

या स्पर्धेतील महाविद्यालयीन गटामध्ये प्रणाली प्रमोद गमरे हिने प्रथम क्रमांक मिळवला, ऋचा श्रीराम सहस्त्रबुद्धे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर केतन पंचनाथ रहाटे याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

खुल्या गटात उदय कुलकर्णी यांनी प्रथम, सागर एकनाथ पाटील यांनी द्वितीय तर शिल्पा प्रदीपकुमार नाईक यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.

शालेय गटात श्रेयशा सहदेव नरळे, आरूषी अमोल साबडे यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर सानिया उदय जाधव हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले आहे.

फक्त १० दिवसांमध्ये अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद ‘माय कोकण’च्या या स्पर्धेला मिळाला. ‘माय कोकण’ परिवारातर्फे सर्व स्पर्धकांचे आभार मानले गेले. परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध कवी कैलास गांधी आणि कवी चेतन राणे यांनी काम पाहिलं.

कवी कैलास गांधी

या स्पर्धेसाठी चांगल्या दर्जाच्या कविता आल्या होत्या. कोरोनाच्या या काळात सगळेच मानसिक तणावाखाली होते. या स्पर्धेच्या निमित्तानं थोडा वेगळा विचार करण्याची संधी अनेकांना मिळाली. माय कोकणचे संपादक मुश्ताक खान गेल्या काही वर्षांमध्ये सतत साहित्याची सेवा करत आहेत. काव्य स्पर्धेला घेऊन नवोदित कवींना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत. आम्हाला या स्पर्धेचा निकाल लावण्यासाठी सतत १२ तास बसावं लागलं. अतिशय कमी गुणांच्या फर्कानं अनेकांचा क्रमांक हुकला आहे. त्यामुळे भविष्यात साहित्याला चांगले दिवस येतील याचा मला विश्वास आहे.

 

चेतन राणे, कवी

माय कोकणच्या या उपक्रमातून उदयन्मुख कवी शोधण्यास मदत होते. मी या स्पर्धेत सहभागी सर्व कवींचं कौतुक करतो. या स्पर्धेच्या माध्यामातून अनेक दर्जेदार कवी अमच्या नजरेस पडले. या स्पर्धेमध्ये पारितोषांची संख्या कमी होती. पण आपला क्रमांक आला नसला तरी आपण कवी म्हणून निश्चितच चांगले आहात. सध्याच्या काळात अशा स्पर्धानं वारंवार होणं आवश्यक आहेत. भविष्यातही माय कोकणच्या माध्यमातून यापेक्षा भव्य स्पर्धा होती अशी अशा करत आहे.