गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल

रत्नागिरीः-  गणेशोत्सवासाठी   कोकणात चाकरमान्यांनी यावर्षी आतापासूनच गावी येण्याची तयारी सुरु केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण आताच फुल्ल झाले आहे. रेल्वेने ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती दिली आहे.
काही अपवादात्मक गाड्यांच्या एसी टू व थ्री टायरच्या काही जागा शिल्लक असल्या तरीही उर्वरित सर्वच क्लाससाठी सर्वच गाड्यांना प्रवासी वेटिंगवर आहेत. तर परतीच्या प्रवासासाठीही १४ तारखेपासून पुढील सहा सात दिवसांचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*