मौजे दापोलीत तरुणांनी साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

दापोली : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्यात उपस्थित राहता येणार नाही म्हणून मौजे दापोलीतील बुरटेवाडी मधील कृष्णाई ग्रामस्थ मंडळाच्या बालकलाकारांनी अयोध्येतील मंदिराची भव्य दिव्य प्रतिकृती साकार केली होती.

तसेच श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजल्यापासून प्रभू श्रीरामचंद्र महायज्ञ,
बारा वाजून वीस मिनिटांनी पूजा, सायंकाळी चार वाजल्यापासून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या शोभायात्रे मध्ये मध्ये विविध वेशभूषा करण्यात आली होती. या मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी आजूबाजूच्या पंचक्रोशीतून रामभक्त यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

यावेळी कृष्णाई ग्रामस्थ मंडळ
बुरटेवाडी व महिला मंडळ तरुणानी मेहनत घेतली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*