NEET परीक्षेसाठी वयाची मर्यादा हटवली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयने नीट परीक्षेसाठीची वयाची मर्यादा हटवण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ‘नॅशनल एलिजिबिलिटी अ‍ॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) परीक्षेसाठी यंदापासून जनरल कॅटगरीसाठीची 25 वर्षे ही कमाल वयोमर्यादा आणि राखीव प्रवर्गासाठीची 30 वर्षाची वयोमर्यादा हटवण्यात आली आहे.

नीट परीक्षेसाठी परीक्षार्थीचे किमान वय 17 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच ही परीक्षा वयाची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंतच देता येईल, असा नियम होता. मात्र आता ही वयोमर्यादा हटवण्यात आली आहे. अ राखीव प्रवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आणि जनरल प्रवर्गासाठी 25 वर्षे होती. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना या निर्णयाचे स्वागत केले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*